देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी आणि तृणमूलच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात गरळ ओकली होती. निवडणुकीनंतरही काही फारसे दोन्ही पक्षांत आलबेल नाही. ...
राज्य सरकारच्या कारभाराच्या विरोधात शुक्रवारी नागपूर शहर काँग्रेस समितीने आक्रमक भूमिका घेतली. व्हेरायटी चौकात चिखलफेक आंदोलन करीत राज्य सरकारच्या पुतळ्याला चिखल फासला ...
राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडल्यानंतर प्रियांका गांधी येथून पोटनिवडणूक लढवणार आहेत. या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी प्रियांका गांधी यांचा प्रचार करू शकतात असे बोलले जात आहे. ...