देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कुर्ला डेअरीची जमीन बांधकामासाठी वळवणारा जीआर त्वरित मागे घ्यावा आणि ही जागा सार्वजनिक उद्यान म्हणून राखीव ठेवावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. ...
कर्नाटकात आणखी तीन उपमुख्यमंत्र्यांची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शनिवारी सांगितले की, पक्षाच्या हितासाठी पक्षकारांनी जाहीर वक्तव्ये करणे टाळावे. राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी एक उपमुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
Maharashtra assembly session 2024: पेपरफुटणे ही गंभीर बाब असून अशा पेपर फुटीमुळे शेकडो होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा घटनांना आळा बसावा म्हणून राज्य सरकार पेपर फुटीविरोधात कडक कायदा करणार आहे का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच ...
Congress Nana Patole Reaction On Maharashtra Budget 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने घोषणांचा सरकाराने पाऊस पाडला आहे. जनता भूलथापांना बळी पडणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Budget 2024: अडीच वर्षे फक्त घोटाळे, टेंडर, कमिशन, टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे. महिलांसाठी योजना आणू ...