देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Ramesh Chennithala News: लोकसभा निवडणुकीत जनतेने मविआला जसा पाठिंबा दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही देतील, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. ...
Rahul Gandhi jammu kashmir assembly election : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. रामबाण येथील सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आता झुकून चालतात, असेही म्हटले. ...
J-K Assembly Elections 2024 : राहुल गांधी हे देखील जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. ...
Haryana Assembly Election 2024: हरयाणातील आंतरराष्ट्रीय पहिलवान विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया आता राजकीय आखाड्यात दिसणार आहेत. हरयाणातील विधानसभा निवडणुकीत या दोन पहिलवानांना तिकीट देण्याचा विचार काँग्रेस करत आहे. ...