देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Ramdas Athawale News: राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष राजकारणातून संपेल. देशातील आरक्षण कधी संपणार नाही. राहुल गांधी, काँग्रेस पक्षाला धोका असू शकतो, पण देशातील लोकशाहीला धोका नाही, असा टोला रामदास आठवलेंनी लगावला. ...
Sanjay Gaikwad: मी वक्तव्य केले, जर मीच माफी मागत नाहीय तर मुख्यमंत्री कशाला मागतील, असे सांगत राहुल गांधींवरील वक्तव्यावर माफी मागणार नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. ...