देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
जिल्हा न्यायालयापासून मंडई पुढे थेट स्वारगेट पर्यंत या मार्गाचे सर्व काम सुरू झाले असले तर तो त्वरीत सुरू करावा असे मेट्रोच्या नियमित प्रवाशांचे म्हणणे आहे ...
Maharashtra Politics : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. ...
निवडणुकीनंतरही ही योजना सुरू राहील. काँग्रेसचे लोक या योजनेविरोधात कोर्टात गेले. गरिबांना पैसे मिळाले तर विरोधकांच्या पोटात का दुखतंय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. ...
Rahul Gandhi citizenship issue : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयात आहे. या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्राकडे याबद्दलची माहिती मागितली आहे. ...