देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० हून अधिक जागा लढवणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, त्यावर आता संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सकाळी पुणे येथील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले. ...
Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच ज्या जागांवर उमेदवार जाहीर होत आहेत. तिथेही पक्षांतर्गत मतभेद उफाळून येताना दिसत आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 : पक्षाच्या वतीने बी.एल.ए. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात ठाणे लोकसभेचे निरीक्षक संवाद साधणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. ...
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यात भाजपातील इच्छुकांची नाराजी जाहीर समोर आली आहे. ...