देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
संख्याबळावरून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी ही निवडणूक काहीशी सुकर मानली जाते. परंतु, विजयासाठीच्या आकडा गाठण्यासाठी युतीला देखील काही अपक्षांची गरज भासू शकते. ...
अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर जिल्हा काँग्रेसतर्फे इर्विन चौकात निषेध नोंदविण्यात आला. ...
भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी वरील दोन्ही तालुक्यांच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका ...
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पीडितांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातील पोलिसांनी मिर्जापूर येथे अटक केल्याच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या वतीने योगी सरकारच्या निषेधार्थ ...