देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकसभेला आंबेडकरांनी आघाडीसोबत जाणे टाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सहा ते सात जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. तर वंचितला एक जागा मिळाली. आता वंचित बहुजन आघाडी विधानसभेला पुन्हा एकदा जोर लावण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
विधानसभा निवडणुसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यासाठी काँग्रेस प्रदेश नेत्यांनी रविवारी इच्छुकांच्य ...
काँग्रेसने सपा आणि बसपा यांच्या मदतीने मध्य प्रदेशात सरकार बनविलं आहे. भाजपाला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या म्हणून आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं असतानाही आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला नाही ...