कर्नाटकात भाजपाला 'अच्छे दिन', काँग्रेस अन् जेडीएसचे 14 आमदार अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 02:48 PM2019-07-28T14:48:54+5:302019-07-28T14:50:58+5:30

कुमारस्वामींचं सरकार कोसळल्यानंतर भाजपानंही कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी कंबर कसली आहे.

BJP 'good day' in Karnataka, 14 MLAs of Congress and JDS are ineligible by speaker | कर्नाटकात भाजपाला 'अच्छे दिन', काँग्रेस अन् जेडीएसचे 14 आमदार अपात्र

कर्नाटकात भाजपाला 'अच्छे दिन', काँग्रेस अन् जेडीएसचे 14 आमदार अपात्र

Next

बंगळुरू - कर्नाटकमध्ये महिन्याभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस, जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर कर्नाटक सरकार अडचणीत आलं होतं. त्यानंतर कुमारस्वामी सरकारनं विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यात 99 आमदारांनी सरकारच्या बाजूनं, तर 105 आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे साहजिकच कुमारस्वामी सरकार कोसळलं. मात्र, विधानसभा सभापती रमेश कुमार यांनी दलबदलू आणि बहुमत चाचणीवेळी सभागृहात दांडी मारणाऱ्या 14 आमदारांना अपात्र ठरवलं आहे. विशेष म्हणजे 2023 पर्यंत काँग्रेस आणि जेडीएसच्या या 14 आमदारांना अपात्र ठरविल्याचा आदेश रमेश कुमार यांनी दिला.

कुमारस्वामींचं सरकार कोसळल्यानंतर भाजपानंही कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपाच्या आमदारांची बैठक येडियुरप्पांच्या अध्यक्षतेखाली एका हॉटेलमध्ये झाली. येडियुरप्पांनी भाजपाध्यक्ष अमित शहांना पत्र लिहून समर्थन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. त्यामुळे, विधानसभेत भाजपकडून बहुमत सिद्ध करण्यात येईल. तत्पूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी 14 आमदारांना अपात्र ठरवले आहे. त्यामध्ये काँग्रेसचे 11 आणि जेडीएसच्या 3 आमदारांचा समावेश आहे. पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत रमेश कुमार यांनी ही कारवाई केली. तसेच, मी माझ्या विवेकबुद्धीने न्यायपूर्ण निर्णय घेतल्याचंही रमेश कुमार यांनी म्हटले. सभापती रमेश कुमार यांच्या या निर्णयामुळे भाजपाला एकप्रकारे अच्छे दिन आले आहेत. काँग्रेस जेडीएसच्या या फुटीरवादी आमदारांना आपल्याकडे घेण्याचा भाजपाचा डाव कोलमडला आहे. पण, सभागृहातील संख्याबळ कमी झाल्याने भाजपा सत्तेचा दावेदार ठरला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएसच्या पक्षनेत्यांनी या फुटीर आमदारांना अपात्र ठरविण्याचा आग्रह सभापतींकडे केला होता. त्यानुसार, सभापतींनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कर्नाटक विधानसभेतील सदस्यांची संख्या 208 झाली असून बहुमताचा आकडा 105 असणार आहे. भाजपाकडे बहुमताचा आकडा देता येईल, एवढी सदस्यसंख्या आहे. त्यामुळे लवकरच कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता स्थापन होईल. 
 

Web Title: BJP 'good day' in Karnataka, 14 MLAs of Congress and JDS are ineligible by speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.