देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
२०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत अमित झनक यांनी काँग्रेसची ही जागा कायम राखली होती. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर या मतदार संघातील स्थिती बदलल्याचे दिसून येते. ...
बॅलेट पेपर आणा, लोकशाही वाचवा, वाचवा रे वाचवा लोकशाही वाचवा अशा घोषणा देत विरोधी पक्षांनी आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी (दि.९) निदर्शने केली. ...