देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
युतीच्या बाबतीत शिवसेनेने नमते घेतले तरच युती टीकेल, अन्यथा भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला लागल्याप्रमाणे शिवसेनेलाही गळती लागण्याची शक्यता आहे. ...
युवक काँग्रेसने ६० जागा प्रदेशाकडे मागितल्या आहे. पण निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना नक्कीच संधी मिळणार आहे. इतर राजकीय पक्षाचा विचार केल्यास युवकांना फक्त आता काँग्रेसमध्येच संधी असल्याचे मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले ...
सध्या राष्ट्रवादीतून अनेक नेते पलायन करत असून भाजप किंवा शिवसेनेचा भगवा ध्वज हातात घेत आहेत. परंतु, आता यापुढे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हातात देखील भगवा झेंडा दिसणार आहे. ...
मोदींनी अशी कामं केली जी मागील काळात झाली नाही. त्यामुळे जनता त्यांचं कौतुक करत आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत या व्यक्तीविरुद्ध लढा देणे कठीण आहे. ...