देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
वंचितमध्ये एमआयएम आणि आंबेडकर यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे समजते. यावरून वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार असं चित्र आहे. मात्र अशा स्थितीत कुणाच्याच हाती काही लागणार नाही, असंही होण्याची शक्यता आहे. ...
राज्यातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची वाट न पाहता निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत. त्यामुळे वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत आहेत. ...
अमरावती येथून सोमवारी प्रारंभ झालेली महापर्दाफाश यात्रा मंगळवारला दुपारी १ वाजता भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. शहरातील साखरकर सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. ...
भाजप सरकारची पोलखोल करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात गुरुकुंज मोझरी येथून निघालेली काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा पुलगावात आली होती. यावेळी संबोधित करताना माजी खासदार नाना पटोले बोलत होते. ...