देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Shashi Tharoor: दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. हे शिष्टमंडळ जगभरातील प्रमुख देशांचा दौरा करून तेथे भारताची भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. मात्र या शिष्टमंडळामध्ये ...
पी. चिदंबरम यांनी इंडिया आघाडी बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 'इंडिया आघाडी कमकुवत झाली आहे. जर ही विरोधी आघाडी पूर्णपणे अबाधित राहिली तर मला खूप आनंद होईल',असं विधान चिदंबरम यांनी केले. ...
देशातील खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण लागू करण्याची पक्षाची मागणी आहे. या क्षेत्रातील आरक्षणासाठी सरकारवर पक्ष दबाव वाढवणार असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. ...