छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्व आमदारांची बैठक बोलावली पाहिजे. हा निर्णय सामूहिकपणे घेतला पाहिजे असं मत पक्षातील आमदारांचे होते. ...
अजितदादांचे आयुष्य पाहिले तर त्यांच्या जीवनात कायम त्रास भोगावा लागला. त्यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. शरद पवारांच्या देखरेखीत ते मोठे झाले असं भुजबळांनी सांगितले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा अजित पवार यांच्या निधनानंतर प्रामुख्याने केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावत आहेत. त्यातच आता भुजबळांनी एक विधान केले. ...
विधिमंडळ पक्षाचे गटनेतेपद हे प्रशासकीय कामकाजात अतिशय महत्त्वाचे असते. विधिमंडळात पक्षाची भूमिका मांडण्यापासून व्हिप जारी करण्याचे अधिकार त्याच्याकडे असतात. ...
अनेक लोकांच्या सूचना पुढे येत आहेत. त्या रास्त आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद द्यावे अशी अनेकांची मागणी आहे. ते चूक आहे असं वाटत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. ...