चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
हिंदीत एक म्हण आहे, 'चंदा मामा दूर के', मात्र आता आपण म्हणून शकतो, 'चंदामामा अपने घर के', असे सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ स्पेस तथा इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ यांनी म्हटले आहे. ...
भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. ...
Chandrayaan 3: भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला. भारतीय संतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चंद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. ...
भारताचं ‘चांद्रयान ३’ चंद्राच्या कक्षेत फिरत असून आज(२३ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास यानातील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्त्रोच्या या मोहिमेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. ...