या चाचण्या देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, लखनौसह १९ ठिकाणी केल्या जाणार असून, त्यात १८ वर्षे वयावरील २८,५०० स्वयंसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे. झायडस कॅडिलातर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे. ...
कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७७,६१,३१२, तर बरे झालेल्यांचा आकडा ६९,४८,४९७ वर पोहोचला आहे. शुक्रवारी कोरोनाचे ५४,३६६ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आणखी ६९० जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या ...
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या २०१९-२०साठी आपल्या सर्व पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना वगळून) ७८ दिवसांच्या वेतना एवढा बोनस देण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. ...
केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, अनिवासी भारतीय आणि भारतीय मुळाचे लोक कार्डधारक आणि इतर सर्व विदेशी नागरिक पर्यटन वगळता इतर कोणत्याही कारणासाठी भारतास भेट देऊ शकतात. ...
या अतिरिक्त जमिनींवर नव्या पायाभूत सुविधा उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या मंत्रालयांच्या अतिरिक्त जमिनींवर उभारल्या जाणाऱ्या व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधा यासंबंधीच्या योजनेला मंजुरीही देण्यात आली आहे. ...
सूत्रांनी सांगितले की, बँकिंग आणि विमा क्षेत्रास ‘रणनीतिक क्षेत्र’ (स्ट्रॅटेजिक सेक्टर) म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. याचाच अर्थ दीर्घकालीन पातळीवर देशात सरकारी मालकीच्या प्रत्येकी चारच बँका आणि विमा कंपन्या राहतील. काही कंपन्यांचे विलीनीकरण आणि ...