ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाले आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ९८ व्या वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
दिलीप कुमार यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरापर्यंत बॅरिकेट्स लावण्यात आले होते. यामुळे संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. निमंत्रित व्यक्ती आणि माध्यम प्रतिनिधी वगळता एकाही व्यक्तीला आत जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. ...
दिलीप कुमार यांना ६ जून रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुप्फुसात पाणी भरण्याचा त्रास त्यांना होत होता. ...
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात झालेल्या फसवणुकीमध्ये दिलीपकुमार अडकले होते. या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला दिलीपकुमार यांनी उपस्थित रहावे, असे समन्स जिल्हा व सत्र न्यायालयाने काढले होते. ...