श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, एक वर्षासाठी त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बजावले आहेत. ...
Congress Rahul Gandhi And BJP Narottam Mishra : राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी कृषी कायदा आणि भारत चीन तणावावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावरून नरोत्तम मिश्रा राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ...
फेक टीआरपीप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात अला. याप्रकरणी हंसाचा विशाल वेद भंडारी (२१), नारायण नंदकिशोर शर्मा ( ४७) आणि अंधेरीतील पी. एन. मेस्त्री (४४), शिरीष सतीश पट्टनशेट्टी (४४) यांना अटक करण्यात आली ...