श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल बोलताना लालू प्रसाद यादवांनी हे विधान केलं होतं. ...
पक्षाच्या निरीक्षकांची नावे कधीही घोषित होण्याची शक्यता आहे. भाजप प्रमुख जे. पी. नड्डा आणि ज्येष्ठ नेते कोणत्याही क्षणी पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. ...
येणाऱ्या निवडणुका महायुतीत लढवाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी महायुतीत न लढण्याचा परिणाम मतदारांवर होतो हे अनुभवलं आहे असं मत मंत्री संजय शिरसाट यांनी मांडले. ...
Anubhav Singh Bassi News: स्टॅण्डअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचा लखनौमधील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याचा कार्यक्रमासंदर्भात भाजपच्या नेत्या अपर्णा यादव यांनी तक्रार केली होती. ...