भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते. Read More
Bhagwant Mann And Arvind Kejriwal : भाजपाच्या 400 पार करण्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, भारतातील 140 कोटी जनता ठरवेल की कोणाला किती जागा मिळतील. हा देश कोणाची खासगी मालमत्ता नाही. ...
Mamata Banerjee News: लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या पंजाबच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेसला धक्का दिल्यानंतर ममता बॅनर्जी ह्या २१ फेब्रुवारी रोजी पंजाबच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे ...