जमिनीचा फेरफार आॅनलाईन केल्यानंतर बक्षीस म्हणून हजार रुपयांची लाच घेताना हिंगणगाव सजाच्या तलाठ्यास पकडण्यात आले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी दुपारी गेवराई शहरात पकडले. ...
पैशाच्या व्यवहारातून एका सराफा व्यापाºयास मारहाण झाल्याची घटना पाटोदा शहरात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आठ जणांविरोधात पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. खरीप दुष्काळ अनुदान, २०१६ अतिवृष्टी अनुदान, पिक विम्याचे पैसे बँकामध्ये जमा झाले आहेत. मात्र, यामधून कर्जाची रक्कम वळती करुन घेतली जात आहे. तसेच ...
दुष्काळामुळे यावर्षी परळी शहरात पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी परळी नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्नशील असून नगरसेवकांनी आणि पालिकेने अधिक दक्षतेने काम करावे अशी सूचना विधान परिषदे ...
शिराळ शिवारातील शेतात जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल,अलिशान गाड्यांसह ३० लाखांचा माल जप्त केला. ...
येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा पेच आठवडाभरापासून सुटत नव्हता. अखेर मंगळवारी दुपारी भाजपा, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या २२ नगर सेवकांनी एकत्र येऊन प्रत्येक पक्षाला नऊ-नऊ महिने उपाध्यक्ष पद वाटून घेतले. ...
जिल्ह्यातील चारा छावण्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने तपासणी करण्यात आली होती. काही चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची तफावत आढळून आली होती. ...