गुरुवारी रात्री जिल्हाभरात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानूसार ‘आॅल आऊट आॅपरेशन’ राबवण्यात आले. यादरम्यान गेवराई हद्दीत खूनातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ...
तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील रेणुका देवीच्या मंदिरातील पुजाऱ्याचा खून करून दानपेटीतील रक्कम चोरीच्या घटनेला तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही पोलीस प्रशासनाला आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. ...
बीड शहरात पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम रखडले आहे. हीच बाब ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणली. यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी मुंबईत बैठक घेत दोन्ही योजनेचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. ...
जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतील सावळ्या गोंधळाबद्दल रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रक्त विक्री करणा-यांची साखळीच सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. ...
जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत शिक्षण आणि आरोग्य समिती उपाध्यक्ष बजरंग सोनवणे तर अर्थ व बांधकाम समिती जयसिंह सोळंके यांच्याकडे सोपविण्यात आली. ...
शासनाच्या हमीदराने तूर खरेदीसाठी नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नोंदणी सुरु असून २६ दिवसात ३ हजार ९७ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून खरेदीची प्रतीक्षा आहे. ...