"ताई, दादा… आता कसली पाहणी करताय? काहीच शिल्लक राहिले नाही. आम्हाला थेट मदत द्या, त्यातून कसेबसे कर्ज फेडू," अशा भावना शेतकरी सरकारपुढे व्यक्त करत आहेत. ...
बीड जिल्ह्यात एकीकडे अजित पवार पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परळी मतदारसंघात पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. ...