Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Beed crime, Latest Marathi News
बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. Read More
BJP Suresh Dhas News: वन विभागाने कोणतीही नोटीस न बजावता घर पाडले. ते कोणत्या नियमांनी त्यांनी केले, याचे उत्तर मिळाले, तर बरे होईल. त्याला तात्पुरता दिलासा देऊन पुनर्वसनाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करू, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. ...
Sharad Pawar Anjali Damania news: बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. त्यावरून अंजली दमानियांनी पवारांनाच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिले. ...
Beed Teacher: संतोष देशमुख हत्या आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा चीड आणणारी घटना घडली आहे. एका शिक्षकाने संस्थेतील लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शिक्षकाने आत्महत्येपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. ...