हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त वसईमध्ये त्यांना अर्कचित्र माध्यमातून साकारलेल्या विविध भावमुद्रांचे फोटो प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (शनिवारी) सहावा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर दाखल होत आहेत. ...
स्मारक म्हणजे आपल्याकडे प्रतिष्ठतेचा विषय मानला जातो. सरकारवर कर्जाचा कितीही बोजा असला तरी स्मारकांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध केला जातो. आमच्या कार्यकाळात अमूकएक स्मारक झाले हे मिरवण्यासाठीही खटाटोप केला जातो. ...