अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
जमावाने केलेल्या हत्या, महिलांचे संरक्षण, जम्मू आणि काश्मीर राज्यातील सरकार, दलितांवर झालेल्या अन्यायाच्या घटना, शेतकऱ्यांचा प्रश्न, बेरोजगारी अशा विषयांवर चर्चा करायची आहे असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी स्पष्ट केले आहे ...
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतील सुधारणा होत असल्याची माहिती एम्स रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे त्यांना येत्या काही दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ...
एम्स हॉस्पिटल प्रशासनाकडून मंगळवारी (12 जून) जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी औषधोपचारांना प्रतिसाद देत आहेत. ...