अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
३१ डिसेंबर १९८० रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी डोंबिवलीस भेट दिली होती. आताच्या इंदिरा गांधी चौकात स्वामी विवेकानंदांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. ...
भाजपाची स्थापना झाल्यानंतर पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड झाली होती. हा काळ साधारणता 1980 च्या दशकाचा असावा, त्यानंतर वाजपेयीची कोकणात सभा घेण्याचे ठरले. ...
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १९६६ आणि १९८० साली अमरावतीत जाहीर सभा झाल्या. अमरावतीशी त्यांचे ऋणानुबंध होते, अशी माहिती जनसंघाचे जुने जाणते कार्यकर्ते छोटेलाल केसरवानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
एकदा अटलबिहारी वाजपेयी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. पुणे दौºयावरून ते रेल्वेने मुंबईकडे जाणार होते. मी सुद्धा त्यांच्याबरोबर होतो. त्यांना गाडीतून पुणे रेल्वेस्टेशनला सोडले. ते रेल्वेत बसणार तेवढ्यात त्यांना काहीतरी आठवले आणि ते दहा पाऊले म ...
नाशिक : देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असल्याने चिंताक्रांत असलेले या पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक सायंकाळी शोकसागरात बुडाले. वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त कळताच कार्यकर्त्यांना अश्रुअनावर झाले. ...
भाजपा स्थापनेचा दोन वर्षानंतर पक्ष वाढीसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नांदेडमध्ये १९८२ मध्ये पहिली जाहीर सभा घेतली होती. पक्ष कार्यासाठी तत्कालीन भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीन लाखांची थैलीही वाजपेयी यांना भेट दिली होती. भाजपाची स्थापना १९८० म ...