अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
भारतीय राजकारणातील अजातशत्रू नेते, देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न किताबाने गौरविण्यात आलेले भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी यमुना तीरावर पंचत्वात विलीन झाले. ...
माणसाचे मोल त्याच्या प्रस्थानानंतर होते. त्याचा चांगुलपणा तेव्हाच उठून दिसतो असे सर्वसामान्य माणसाबद्दल बोलले जाते; पण अर्धशतकात राजकीय अवकाशात तळपत राहूनही चांगुलपणा आणि केवळ चांगुलपणा टिकवणारे नाव अटलबिहारी वाजपेयी. ...
अटलजी व्यक्तींपेक्षा मुद्यांवर बोलणे अधिक पसंत करत. त्याचा परिणाम असा झाला की वाजपेयी अजातशत्रू बनले. कोणत्याही आव्हानांवर आपल्या भाषाकौशल्याने मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. ...
जो खरा ‘सांस्कृतिक’ असतो, तो कधीच कुणाचे वाईट चिंतित नाही. वाईट बोलतही नाही. अटलजींचे अंत:करण स्वच्छ, नितळ होते. म्हणून त्यांची टीकाही विशिष्ट स्तर जपणारी होती. ...
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, वाजपेयी यांच्या निधनाबाबत भाजपाचे नगरसेवक असंवेदनशील दिसून आले. ...