आओ फिरसे दिया जलाये...दीपप्रज्वलन करून अटलजींना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:52 PM2018-08-18T12:52:03+5:302018-08-18T12:53:34+5:30

अकोला : अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालयात अटलजींना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिल्लीमध्ये होत असलेल्या अंतिम संस्काराचा वेळ साधत अकोल्याच्या कार्यालयात एकशे पाच पणत्या लावून आगळी-वेगळी श्रद्धांजली दिली.

pay tribute to Atalji by lighting a lamp | आओ फिरसे दिया जलाये...दीपप्रज्वलन करून अटलजींना श्रद्धांजली

आओ फिरसे दिया जलाये...दीपप्रज्वलन करून अटलजींना श्रद्धांजली

Next
ठळक मुद्देसकाळी ११ वाजता भाजपा कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची भाषणे झाली.

अकोला : अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालयात अटलजींना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिल्लीमध्ये होत असलेल्या अंतिम संस्काराचा वेळ साधत अकोल्याच्या कार्यालयात एकशे पाच पणत्या लावून आगळी-वेगळी श्रद्धांजली दिली.
त्यावेळी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, वसंत बाछुका, कृष्णा शर्मा, हरिभाऊ काळे, रामदास तायडे, अनिल गावंडे, रवी गावंडे, अमरसिंग भोसले, गिरीश जोशी, डॉ. विनोद बोर्डे, अजय शर्मा, माधव मानकर, संजय उजाडे, शिवा शर्मा, रमण जैन, गजानन राजभाट, वसंत मानकर, अभिमन्यू नळकांडे, परमेश्वर साखरे, काशीराम हिवराळे, राजूभाऊ कुलकर्णी, वसंतराव मानकर, विजय फुकट, रमाकांत भरकर, राजू कुलकर्णी, रामदास तायडे, स्वप्निल बोळे, जितेश अहीर, सुजित शहा संदीप वानखडे, तेजराव इंगळे, व्ही.पी. देशमुख, लक्ष्मीकांत गावपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची भाषणे झाली.
त्यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, डॉ. विनोद बोर्डे, डॉ. किशोर मालोकार, गिरीश जोशी, अनिल गावंडे, माधव मानकर, अनुप गोसावी, गजानन लोणकर, अजय शर्मा हरिभाऊ काळे, विवेक भरणे, बबलू देशमुख, उकंडराव सोनोने, बबलू पळसपगार, संजय उजाडे, दिलीप मिश्रा, अमोल गोगे, विजय फुकट, रमाकांत भरकर, बाबुलाल कांगटे, हेमंत शर्मा, अनिल पटेल, रोहित खोवाल, अक्षय गंगाखेडे, तुषार कुंभार, मोहित सैवाल, अभिषेक भगत, अमोल गीते, बाबाराव भाकरे, किशोर मुरकुटे, रामदास सरोदे, राजू थोरवे, संजय जोशी आदी उपस्थित होते. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांनी भाजपा कार्यालय दिल्ली येथे नमन व श्रद्धांजली अर्पण करून अटलजींच्या अंतिम यात्रेत सहभागी झाले.

 

Web Title: pay tribute to Atalji by lighting a lamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.