आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त २८ ते ३० जूनदरम्यान पंढरपूर सायकलवारीचे आयोजन करण्यात आले असून, कॅन्सर व लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार या विषयांवर जनजागृती करत ७०० सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. ...
श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी प्रभू वैद्यनाथांच्या परळीत आगमन झाले. ...
सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले होते. ...