“स्वतः ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:01 AM2021-07-20T11:01:13+5:302021-07-20T11:03:05+5:30

मुंबईतून पंढरपूरला मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत गेले. यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

atul bhatkhalkar criticised cm uddhav thackeray over pandharpur tour and chembur incident | “स्वतः ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं”

“स्वतः ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं”

Next

मुंबई: आषाढी एकादशीनिमित्ती विठूरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात पार पडली. यावेळी चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. मुंबईतून पंढरपूरला मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत गेले. यानंतर तेथील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावाही घेतला. मात्र, यावरून आता भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (bjp atul bhatkhalkar criticised cm uddhav thackeray over pandharpur tour and chembur incident)

मुंबईत पावसाच्या रौद्ररुपामुळे चेंबूर येथे मोठी दुर्घटना घडली. यासह उपनगर आणि जवळच्या पालघर, रायगड जिल्ह्यांनाही पावसाने झोपडले. मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. बहुतेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले. यारून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

उपचारांचे दर ठरविण्याचा महाराष्ट्राला अधिकार नाही; सुप्रीम कोर्टाने राज्याची याचिका फेटाळली

तर लोटांगण घातलं असतं

स्वतः ड्रायव्हिंग करत शनिवारी चेंबूरपर्यत गेले असते तर लोटांगण घातलं असतं, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. तसेच याआधी, मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..., असे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन टीका केली होती. 

दरम्यान, चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील डोंगरावर वसलेल्या न्यू भारत नगर या झोपडपट्टीवर भाभा अणुसंशोधन केंद्राची (बीएआरसी) संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत १९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. तसेच विक्रोळीतील सूर्य नगर येथील पंचशील चाळीतील सहा घरांवर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळून १० नागरिकांनी जीव गमावला आणि पाच जण जखमी झाले. भांडुपच्या महाराष्ट्र नगर परिसरातील अमर कौर विद्यालायाशेजारील घराची भिंत कोसळून सोहम थोरात या १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर अंधेरी आणि पोयसर येथे विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला.
 

Web Title: atul bhatkhalkar criticised cm uddhav thackeray over pandharpur tour and chembur incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.