आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
पंढरीसी जावे आल्यानो संसारा।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग उभ्या महाराष्ट्राच्या मनीमाणसी घर करुन आहे. याचा प्रत्यय पिढ्यान् पिढ्या आषाढी- कार्तिकीच्या वेळी प्रत्येकाला येत असतो. असाच काहीसा प्रत्यय शुक्रवारी जिल्हाभरात आषाढी एकादशीनिमित्त अबालवृद् ...
पालकमंत्री पंकजा मुंडे आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दोघे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगडावर एकत्र आले आणि उठणाऱ्या राजकीय वावड्यांना पूर्णविराम दिला. आगामी बीड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुंडे-क्षीरसागर या ...
देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी अनेक भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. ‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ असे म्हणत जिल्ह्यातून दुष्काळाला हद्दपार कर माऊली असेच साकडेच भाविकांनी आज विठ्ठल चरणी घातले. ...
आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी शहरात अवघी पंढरी अवतरली होती. येथील विठ्ठल मंदिरात वैष्णवांचा मेळा भरला होता. विठुनामाच्या गजराने शहर भारावून गेले होते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...