आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा एक-दोन अपवाद वगळता अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांना महापूजा करण्याची संधी मिळालेली आहे. ...