Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडले. त्यातील अजितदादांच्या नेतृत्वात एका गटाने भाजपासोबत सत्तेत बसणे पसंत केले. दुसरीकडे शरद पवारांच्या नेतृत्वातील एका गटाने विरोधात राहण्यावर भर दिला. ...
अजित पवार अनंतात विलीन झाले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी एक पोस्ट करत भावनांना वाट मोकळी करून दिली. ...
Ajit Pawar Passed Away महापालिका निवडणुकीत पक्षाचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई निश्चितपणे करू, तसेच संघटना अधिक मजबूत करून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचा निर्धार व्यक्त केला होता ...
Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताच्या प्राथमिक तपासात पायलटची चूक असल्याचे उघड झाले आहे. बारामती विमानतळावर कमी दृश्यमानतेत दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान हा अपघात झाला. ...