Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Ajit Pawar Plane Crash : DGCA आणि AAIB ने हा ब्लॅक बॉक्स पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किरण गुजर यांनी दिली. ...
Shiv Sena Ban VSR Company: अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने 'VSR' कंपनीच्या विमानांवर बंदी घातली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या मागणीला हिरवा कंदील दिला आहे. ...
Ajit Pawar Plane Crash FIR Row : अजित पवार विमान अपघातावरून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. VSR कंपनीशी काही मंत्र्यांचे संबंध असल्याचा आरोप करत, DGCA कडून पुरावे नष्ट केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. ...
Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात बारामती येथे झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. ...
Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. ...