कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संपूर्ण देशातील न्यायालये सध्या बंद आहेत. यात पाच वर्षांपेक्षा कमी प्रॅक्टीस असलेल्या ज्युनिअर वकिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
कोरोनामुळे शहरात करण्यात आलेल्या लॉक-डाऊनमुळे जिल्ह्यातील न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या काही ज्युनिअर वकिलांपुढे आर्थिक समस्या उभी राहिली आहे. ती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या मदतीसाठी पुणे बार असोसिएशनने मदत निधीसाठी आवाहन केले आहे. ...
तसेच पैशांची गरज जास्त असल्यास संबंधीतांना कर्ज सुविधा उपलब्ध करु न देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. वैद्यकीय अडचण असल्यास संबंधितांना वकील कल्याणकारी निधीमधून बार कौन्सिलद्वारे तातडीने मदत दिली जाणार आहे ...
कोरोनाला नष्ट करण्यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी वकिलांच्या संघटनांनी गुरुवारी एकाच दिवशी १४ लाख रुपयावर रक्कम गोळा केली. ...