ठाण्याच्या उपवन तलावांमध्ये तरूणाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 19:54 IST2021-07-03T19:53:12+5:302021-07-03T19:54:00+5:30
Thane News: शनिवारी शनिवारी सायंकाळी उपवन येथील तलावांमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या सोहेल बेग (२४) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

ठाण्याच्या उपवन तलावांमध्ये तरूणाचा बुडून मृत्यू
ठाणे - गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पोहण्यासाठी गेले असताना बुडून मृत्यू होण्याचे सत्र सुरू आहे. शनिवारी शनिवारी सायंकाळी उपवन येथील तलावांमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या सोहेल बेग (२४) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. अद्यापही त्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी हजुरी येथील मयत सोहेल आणि त्याचा मित्र अरबाज इब्राहीम शेख असे दोघे ठाण्यातील उपवन येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात उतरल्यावर सोहेल याला पोहायला न जमल्याने तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती, अग्निशमन विभागास वर्तकनगर पोलीस,टीडीआरडी पथक यांनी घटनास्थळी धाव घेत, त्याचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा मृतदेह संध्याकाळी उशिरापर्यंत मिळून आला नव्हता. तदपूर्वी ही कळव्यातील ठाकूर पाडामधील खदानीत बुडून बालकाचा मृत्यू झाला होता. गेल्या पंधरा दिवसातील ही सहावी घटना आहे.