शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Video : ह्रदयद्रावक! निकाहाआधीच खड्ड्यांमुळे तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:55 IST

संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको

ठळक मुद्देरस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरुन खाली पडलेल्या या तरुणीला मागू येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला.नेहा वाडा येथील कुडूस गावात राहणारी असून तिचे पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये ७ तारखेला निकाह होता.

भिवंडी - भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे एका तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. पेशाने डॉक्टर असणारी ही तरुणी स्वतःच्या लग्नाच्या खरेदीसाठी जात असताना निकाह होण्याआधी काळाने तिच्यावर घाला घातला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरुन खाली पडलेल्या या तरुणीला मागू येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर मनोर- वाडा-भिवंडी रोडवर दुगाड फाटा येथे जिजाऊ संस्था आणि संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करुन या घटनेचा निषेध केला.२३ वर्षीय डॉ. नेहा शेख ही तरुणी तिच्या भावाबरोबर बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वाडा-भिवंडी रोडवरुन घरी जात होती. दुचाकीवरुन दुगाड फाटा परिसरातून रात्रीच्या अंधारामधून जाताना रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना दुचाकीचे चाक रस्त्यामधील खड्ड्यात गेले. त्यामुळे दुचाकी आदळल्याने मागे बसलेली नेहा रस्त्यावर पडली आणि त्यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने तिला चिरडले. या अपघातात नेहाचा जागीच मृत्यू झाला. नेहाचा मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.नेहा वाडा येथील कुडूस गावात राहणारी असून तिचे पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये ७ तारखेला निकाह होता. बीएचएमएस करून नेहा डॉक्टर झाली होती. तिचे ताहीर असर यांच्यासोबत विवाह ठरला होता. मात्र, काळाने झडप घातल्याने तिचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbhiwandiभिवंडीmarriageलग्नtwo wheelerटू व्हीलर