कार्यकर्ता मेळावा दिड तास उशिराने, उल्हासनगरात भाजपा प्रदेशाध्यक्षाने आमदार आयलानी यांना दिली भाषण न करण्याची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 20:28 IST2026-01-01T20:28:06+5:302026-01-01T20:28:48+5:30
उल्हासनगर येथील टाऊन हॉल मध्ये महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर भाजपाचं कार्यकर्ता मेळावा गुरुवारी दुपारी १२ वाजता आयोजित केला होता.

कार्यकर्ता मेळावा दिड तास उशिराने, उल्हासनगरात भाजपा प्रदेशाध्यक्षाने आमदार आयलानी यांना दिली भाषण न करण्याची शिक्षा
सदानंद नाईक
उल्हासनगर : टाऊन हॉल मधील भाजपा कार्यकर्ता मेळावा दिड तास उशिरा सुरू झाल्याची शिक्षा म्हणून आमदार कुमार आयलानी व निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांना भाषण करण्यास प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मनाई केली. तसेच येथे महापौर भाजपाचा राहणार असून नागपूर प्रमाणे शहराचा विकास होण्यासाठी उल्हासनगर दत्तक घेण्याची विनंती मुख्यामंत्र्यांना करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
उल्हासनगर येथील टाऊन हॉल मध्ये महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर भाजपाचं कार्यकर्ता मेळावा गुरुवारी दुपारी १२ वाजता आयोजित केला होता. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साडे अकरा वाजता टाऊन हॉलला हजर होते. मात्र पक्षाचे स्थानिक नेते, उमेदवार, पदाधिकारी यांचा पत्ता नोव्हता. शहराध्यक्ष राजेश वधारिया यांची चांगलीच दमछाक झाली. अखेर कार्यकर्त्यांनी हॉल अर्धा भरण्यापूर्वीच चव्हाण यांनी मेळाव्याला सुरवात केली. मेळावा १२ वाजता असताना मी साडे अकरा वाजता हजर असताना मेळावा ऐक वाजता म्हणजे दिड तास सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. वेळेची किंमत नसल्याने, याची शिक्षा म्हणून आमदार कुमार आयलानी, शहर निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांना भाषण करता येणार नाही. यापुढे त्यांना भाषणाची संधी दिली जाईल. असे चव्हाण यांनी दोघांना भर मेळाव्यात सुनावले.
महापालिकेत ५० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येऊन भाजपाचा महापौर होणार असल्याचे मेळाव्यात चव्हाण म्हणाले. त्यासाठी स्थानिक नेते, उमेदवार, पदाधिकाऱ्यांनी दिवसाचे १६ तास काम करा. असे आवाहन केले. पक्ष नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी बूथ पर्यंत काम करून त्यांना कार्यरत ठेवावे लागणार असून त्यांच्यावर पक्षाचे यश अवलंबून आहे. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांचे विकास कामे घरघरात न्या, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सोबत राहणाऱ्यांनी विरोधका सोबत एकत्र आले. ते आता एकत्र का आले. याचे कारण शोधून काढा. शहरातील गुंडशाही मोडून काढून शहराचा नागपूर प्रमाणे विकास करण्यासाठी शहराला दत्तक घेण्याची विनंती मुख्यमंत्री यांना करणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.
भाजपाचा नवा नारा
भाजपाने गेल्या निवडणुकीत हर घर मोदी, घर घर मोदी असा नारा दिला होता. मात्र या निवडणुकीत तुम्हची आमची भाजप आमची हा नारा असेल. असे चव्हाण म्हणाले.
महापौर भाजपाचा
राज्यातील ज्या महापालिकेत भाजप व शिंदेसेना यांची महायुती असेल, त्याठिकाणी महायुतीचा महापौर राहणार आहे. आणि ज्या ठिकाणी भाजप स्वतंत्र लढत असेल त्याठिकाणी भाजपाचा महापौर असणार आहे. असे रविंद्र चव्हाण म्हणाले.
उद्धवसेना उपनेता देवरुखकर यांचा प्रवेश
उद्धवसेनेच्या उपनेत्या व सिनेट सदस्य शीतल देवरुखकर यांचा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पक्ष नेत्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत उल्हासनगरात भाजपात प्रवेश झाला आहे. त्यांना तिकीट नाकारल्याने, नाराज होऊन केला भाजपा प्रवेश