शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

मनसे-भाजप समीकरण जुळल्यास आश्चर्य कसले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 01:22 IST

विधानसभा किंवा महापालिका निवडणुकीत मनसेला यश मिळाले नसले तरी मतदारराजा हाच मनसेचे भवितव्य निश्चित करणार आहे.

- निरंजन डावखरेराज्यात या नव्या समीकरणाचे बरेच कुतूहल वाढलेले आहे. राजकारणात वेगवेगळ्या शक्यतांना वाव असतो. अर्थात, हा एक धोरणात्मक निर्णय असल्याने त्यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. निवडणुका मग त्या कोणत्याही असोत, प्रत्येक निवडणुकीत मतदाराने वेगवेगळा कौल दिलेला असतो. लोकसभेच्या निवडणुकीत वेगळा कौल दिसून आला, तर विधानसभा निवडणुकीत त्यापेक्षा वेगळा कौल दिसून आला. महापालिका, नगरपालिका निवडणुकीतही मतदारराजा हा नेहमीच वेगळा कौल देताना दिसून आला आहे. त्यामुळे विधानसभा किंवा महापालिका निवडणुकीत मनसेला यश मिळाले नसले तरी मतदारराजा हाच मनसेचे भवितव्य निश्चित करणार आहे.भाजप हा दुसऱ्याच्या खांद्यावर आपले ओझे टाकून चालणारा पक्ष नाही. आमचा पक्ष हा मजबूत पक्ष आहे, त्यामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही त्याच जोमाने सामोरे जाणार आहोत. यासाठी आम्हाला दुसºयाच्या खांद्यांवर ओझे टाकण्याची मुळीच इच्छा नाही. मनसे आणि भाजपची विचारधारा वेगळ्या आहेत, हे मान्य आहे. मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दादेखील यात कदाचित येऊ शकतो. मात्र, राजकारणात काहीही अशक्य नसते, हे यापूर्वीही आपण पाहिलेले आहे. त्यामुळे वेगळी समीकरणे जुळत असतील, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसेल. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र, हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो राज्य पातळीवरील वरिष्ठ मंडळी घेतील.(लेखक ठाणे शहर भाजप अध्यक्ष)- शब्दांकन : अजित मांडके

टॅग्स :PoliticsराजकारणMNSमनसेBJPभाजपाNiranjan Davkhareनिरंजन डावखरे