वोक्हार्ट रूग्णलायाच्या रुग्णांनी साजरा केला पतंगोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 19:04 IST2020-01-15T19:04:02+5:302020-01-15T19:04:50+5:30

रुग्णांनी नेहमी पतंगाप्रमाणे स्वच्छंद आयुष्य जगले  पाहिजे.

Wockhardt Hospital Patients Celebrate Kite Festival | वोक्हार्ट रूग्णलायाच्या रुग्णांनी साजरा केला पतंगोत्सव 

वोक्हार्ट रूग्णलायाच्या रुग्णांनी साजरा केला पतंगोत्सव 

मीरा रोड : मीरारोडच्या वोक्हार्ट रूग्णलायाच्या वतीने मकर संक्रांती निमित्त महापालिकेच्या जॉगर्स पार्क येथे रुग्णांसाठी पतंगोत्सवाचे आयोजन केले होते . 50 हुन अधिक रुग्णांनी या उत्सवात सहभागी होऊन मकर संक्रातीचा आनंद लुटला . 

हृदयरोगी, हाडांच्या समस्या तसेच इतर शारीरिक व्याधींनी त्रस्त असे सर्वच वयोगटातील 50 हून अधिक सहभागी रुग्णांनी सदर रुग्णालयात उपचार घेतले होते . रुग्णांना निरोगी आरोग्याचा मोलाचा संदेश देण्यासाठी तसेच रुग्णांनी शारीरिक व्याधींनी खचून न जाता जिद्दीने उभे राहण्यासाठी हा उपक्रम राबविला गेला . 

रुग्णांनी नेहमी पतंगाप्रमाणे स्वच्छंद आयुष्य जगले  पाहिजे. त्यांना रोगमुक्त आयुष्य मिळावं याकरीता सर्वाना एकत्र आणत हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्याकरिता व्यायाम करणे आणि संतुलित आहाराचे सेवन करणे असा सल्ला देण्यात आला. 

Web Title: Wockhardt Hospital Patients Celebrate Kite Festival