शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

चॅटिंगबाबत जाब विचारल्याच्या रागात पत्नीने पतीच्या नाकाचा घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:38 AM

ठोशाबुक्क्यांनीही केली जबर मारहाण

मीरा रोड : पत्नीला मित्राशी चॅटिंग का करतेस, असा प्रश्न विचारणे पतीला महागात पडले आहे. या प्रश्नावर संतापलेल्या पत्नीने पतीस शिवीगाळ करीत ठोशाबुक्क्यांनी मारहाण तर केलीच, शिवाय नाकाचा चावा घेतला.

आरोपी पत्नी कौटुंबिक वादातून माहेरी राहते. मुलीच्या स्पर्धा असल्याने पत्नीने फोन करून पतीला येण्यास सांगितले होते. तो शनिवारी सकाळी कार्यक्रमास जाऊ शकला नाही. परंतु, दुपारी तो सासरी गेला. पत्नीने कार्यक्रमाला न आल्याबद्दल जाब विचारला. त्यावरुन उभयतांमध्ये वाद आणि पत्नी रागाने बेडरूममध्ये निघून गेली. दरम्यान, त्याने तिचा लॅपटॉप पाहिला असता त्यात तिने मित्राशी चॅटिंग केल्याचे दिसून आले. तू मित्राशी चॅटिंग का करतेस, अशी विचारणा त्याने केली. त्यावर या विषयावर रात्री बोलू, असे सांगत तिने त्याला टाळले. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याने पुन्हा तिला मित्राशी चॅटिंग केल्यावरून जाब विचारला. त्यावरून कडाक्याचे भांडण सुरू झाले. संतप्त पत्नीने पतीला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्याच्या नाकास चावा घेऊन जखमी केले. भार्इंदर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार पती हा ३१ वर्षांचा असून वसई-नालासोपारा लिंक रस्त्यावर आईवडिलांसोबत राहतो. तो खाजगी बँकेत नोकरीला असून २०११ साली भाईंदर पश्चिमेच्या तरुणीशी त्याने आंतरधर्मीय प्रेमविवाह केला. परंतु, दोघांमध्ये वाद झाल्याने वसई दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे.

टॅग्स :Policeपोलिस