शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

घोटाळा कुठे झाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:33 IST

प्रशासनाचा दावा : बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या तब्बल तीन कोटींच्या कचराडबे प्रकरणात महापौरांनीच घोटाळा झाल्याची तक्रार केल्यावर पालिकेने महापौरांचा आरोप खोडून काढत घोटाळा झाला नसल्याचे पत्र दिले आहे. प्रतिडबा २१०० रुपयांप्रमाणे पालिकेने तब्बल १४ हजार २८४ डबे खरेदी केले असले, तरी अशा प्रकारच्या डब्यांचा बाजारभाव हा १५०० ते १७०० रुपयांच्या घरात आहे.

मे २०१७ मध्ये महासभेत नगरसेवकांनी ओला व सुका कचरा वेगळा करण्यास प्रोत्साहन द्यावे, म्हणून डबेखरेदीचा ठराव केला होता. यासाठी पालिकेने आॅनलाइन निविदा मागवल्या होत्या. जुलै २०१८ मध्ये नीलकमल यांना प्रतिडबा २१०० रुपयांप्रमाणे तब्बल १४ हजार २८४ डबेखरेदीचा कार्यादेश दिला. या खरेदीसाठी तब्बल तीन कोटींचा खर्च आला आहे. गेल्या सप्टेंबर-आॅक्टोबरदरम्यान कंत्राटदाराने महापालिकेस निळ्या व हिरव्या रंगाचे डबे पुरवले. महापौरांसह नगरसेवकांनी नागरिकांना मोफत डबे पुरवण्याचा दावा करत इमारतींना प्रत्येकी दोन डबे वाटण्यात आले. परंतु, डबेवाटपानंतर घनकचरा शुल्काची देयके नागरिकांच्या हाती पडल्याने ते संतापले.

दरम्यान, महापौर डिम्पल मेहता यांनी डबेवाटप तसेच पाच हजार चाके व रॉड कमी असल्याचे तसेच काही नगरसेवकांनी डब्यांवर नावे टाकल्याची तक्रार केली. महापौरांनीच डबेप्रकरणी घोटाळा झाल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली.

आता उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी महापौरांना पत्र देऊन डबे प्रकरणात घोटाळा झाला नसल्याचा दावा केला आहे. डब्याची चाके व रॉड, क्लिपा, झाकणे आदी अपुऱ्या प्रमाणात पुरवल्याने वाटप करण्यात अडथळा निर्माण झाला होता. जानेवारीमध्ये कंत्राटदारास कळवल्यानंतर कंत्राटदाराने सुटे भाग पुरवले. प्रत्येक इमारतीस दोन डबे दिले असून त्याची वहीत नोंद केली आहे. प्रभाग ११ मधील नगरसेवकांनी डब्यावर स्वत:ची नावे टाकली असता ते कळताच त्यांची नावे काढली आहेत, असे डॉ. पानपट्टे यांनी पत्रात म्हटले आहे.

डबे खरेदी प्रकरणात लाखोंचा घोटाळा झाल्याची तक्रार सामाजिक कार्याकर्त्यांसह काही लोकप्रतिनिधींनी चालवल्याने पालिकेकडून सारवासारव केली जात आहे. पालिकेने एक डबा २१०० रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले असले, तरी बाजारभाव व आॅनलाइन विक्री संकेतस्थळांवर अशाच प्रकारचे डबे हे १४०० रुपयांपासून १८०० रुपयांना उपलब्ध आहेत. पालिकेने खरेदी केलेल्या तब्बल १४ हजार नग इतके डबे खरेदीचा प्रस्ताव दिल्यास हेच दर आणखी कमी होणार आहेत.दोषींच्या चौकशीची केली मागणीहे डबेही कंत्राटदार कंपनीचेच असल्याने महापालिकेच्या संगनमताने अवास्तव दर आकारून या तीन कोटी रुपयांच्या डबे खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता जिद्दी मराठा, सत्यकाम फाउंडेशन यांनी केला आहे. डबे खरेदी, डब्यांचा दर्जा तसेच वितरणमध्ये घोटाळा झाल्याने कंत्राटदाराचे देयक देऊ नका, तसेच कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा व खरेदी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.