शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

१०० "ची तूरडाळ आहे कुठे?

By admin | Updated: November 7, 2015 01:13 IST

तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यावर तिचे अवैध साठे पकडल्यानंतर तिची प्रतिकिलो १०० रुपयांमध्ये विक्री केली जाणार असल्याचे राज्यातील भाजपाप्रणीत सरकारकडून सांगितले

ठाणे : तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यावर तिचे अवैध साठे पकडल्यानंतर तिची प्रतिकिलो १०० रुपयांमध्ये विक्री केली जाणार असल्याचे राज्यातील भाजपाप्रणीत सरकारकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ठाणे शहरात २१० रुपये, कल्याण-डोंबिवलीत १९० रुपये, मीरा-भार्इंदरमध्ये १४५ रुपये, भिवंडीत २०० रुपये, उल्हासनगरात २०० रुपये, अंबरनाथ-बदलापूरमध्ये १५० ते १६० रुपये या दराने तूरडाळीची विक्री सुरू असल्याने १०० रुपये प्रतिकिलो दराने डाळ खरेदी हे दिवास्वप्न ठरले आहे.यापूर्वी कांद्याच्या दराने शंभरी गाठल्याने गोरगरीब व मध्यमवर्गीय मेटाकुटीस आला होता. आता तूरडाळीने उच्चांक गाठला आहे. ऐन दिवाळीत सणासुदीच्या दिवसांत गोरगरिबांना डाळ-भात खाणेही मुश्कील झाले आहे. शिवसेनेने तूरडाळ आमच्यामुळे स्वस्त झाली, असा दावा करीत तिची प्रतिकिलो १२० रुपयांना विक्री केली जाईल, अशी घोषणा करताच शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी भाजपाने १०० रुपये दराने तूरडाळ विक्री करण्याची घोषणा केली. भाजपाने अजून स्वस्त दरातील तूरडाळ विक्रीचे स्टॉल्स फारसे सुरू केलेले नाहीत. मोजकेच काही स्टॉल्स सुरू झाले असले तरी ठाणे परिसरातील शहरांची व्याप्ती लक्षात घेता तेथपर्यंत पोहोचणे सामान्यांना शक्य नाही. परिणामी, महागडी तूरडाळ खरेदी करताना कुठे आहेत अच्छे दिन, असा सवाल ते करीत आहेत.