हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद

By पंकज पाटील | Updated: April 10, 2026 21:02 IST2026-04-10T20:59:45+5:302026-04-10T21:02:26+5:30

Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये जी घटना घडली आहे, त्यात समोरून एखादे मोठे वाहन आले असते, तर त्या तरुणाचा जीवही गेला असता. 

What is going on! First they hit the youth, then they dragged him away as soon as he asked a question, the incident in Ambernath was caught on camera | हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद

हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद

-पंकज पाटील, अंबरनाथ
Ambernath Crime: अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराने एका तरुणाला फरपटत नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. अंबरनाथ पूर्वेच्या गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना शहर शाखेसमोर हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

डोंबिवलीच्या जोंधळे कॉलेजमध्ये शिकणारा अंबरनाथचा प्रचित डुबे हा तरुण दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास कॉलेजवरून घरी निघाला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पार्किंगमध्ये लावलेली आपली दुचाकी त्याने बाहेर काढली. याचवेळी समोरून येत असलेला दुचाकीस्वार प्रचितला धडकला.

शिव्या का देतो? असे म्हणताच फरफटत नेले

समोरील दुचाकीस्वाराचे लक्ष नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रचितने सांगितले, मात्र या दुचाकीस्वाराने उलट प्रचित यालाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिव्या का देतो? असे म्हणत प्रचित याने त्याची दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला.

त्या दुचाकीस्वाराने प्रचित याला दुचाकीच्या मडगार्डवर फरपटत श्रीरथ हॉटेलपर्यंत नेले आणि तिथे एका रिक्षाला ही दुचाकी धडकली. यामध्ये प्रचित याच्यासह दुचाकीवरील दोघे जणही जखमी झाले. 

दरम्यान, रस्ता ओलांडत असलेल्या फळ विक्रेत्यालाही या घटनेत दुखापत झाली आहे. यानंतर वाद घालून हा दुचाकीस्वार तिथून निघून गेला. तर प्रचित याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. 

या अपघातात माझा जीव गेला असता, तर जबाबदारी कुणी घेतली असती? असा सवाल करत प्रचित याने संबंधित दुचाकी चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title : अंबरनाथ में हिट-एंड-रन: सवाल पूछने पर युवक को घसीटा

Web Summary : अंबरनाथ में एक स्कूटर चालक ने एक छात्र को टक्कर मार दी, फिर सवाल करने पर उसे घसीटा। शिवाजी चौक के पास सीसीटीवी में कैद हुई इस घटना में छात्र और अन्य घायल हो गए। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है।

Web Title : Hit-and-Run: Youth Dragged After Questioning Driver in Ambernath

Web Summary : In Ambernath, a scooterist hit a student, then dragged him when questioned. The incident, caught on CCTV near Shivaji Chowk, left the student and others injured. Police have registered a case.