शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

पालिकेत येऊन काय मिळाले? माजी नगरसेवकाचा शिवसेनेला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:32 IST

केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील एमआयडीसी निवासी भागात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सत्ता असल्याने विकास होईल, ही आशा फोल ठरल्याचे पत्रच येथील माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील एमआयडीसी निवासी भागात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सत्ता असल्याने विकास होईल, ही आशा फोल ठरल्याचे पत्रच येथील माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे व अन्य पदाधिकाºयांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना पाठवले आहे. ग्रामपंचायतीच्या राजवटीतून महापालिकेत आलो, परंतु सध्याची स्थिती पाहता ना घर का, ना घाट का, अशी आमची अवस्था झाल्याची खंतही त्यांनी पत्रात व्यक्त केलीआहे. शिवसेना पदाधिकाºयांचे पत्र पाहता हा एक प्रकारे सत्ताधाºयांना घरचा आहेर दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.सध्या निवासी भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. कचराही नियमितपणे आणि वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. कीटकनाशक फवारणी नियमित होत नसल्याने रोगराई पसरण्याचा धोका आहे. पावसाळ्यात गटारांमधील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने बहुतांश भागांमध्ये पाणी साचते. रस्त्यांवरील पथदिवे सातत्याने बंद असतात. मिलापनगरमधील तलावाची नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे. या नागरी सुविधांच्या उडालेल्या बोजवाºयाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे.शिवसेनेचे येथील आजीमाजी पदाधिकारी याप्रकरणी सातत्याने तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून दाद दिली जात नसल्याचे महापौरांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी उपशहराध्यक्ष यशवंत तावडे, माजी विभागप्रमुख राजू नलावडे आणि विभागप्रमुख धर्मराज शिंदे यांनी हे पत्र महापौर देवळेकर व आयुक्त पी. वेलरासू यांनाही पाठवले आहे.अन्यथा मालमत्ताकर नभरण्याचा विचारएमआयडीसी निवासी विभाग २७ गावांसह केडीएमसीत १ जून २०१५ ला समाविष्ट झाला. तेव्हापासून येथील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. याबाबत, सातत्याने पाठपुरावा करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नाही.सत्ताधारी म्हणून नागरिकांच्या रोषाला आम्हाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. याबाबतीत तातडीने हालचाल न झाल्यास मालमत्ताकर न भरण्याचा आम्ही विचार करू, असा इशारा संबंधित पदाधिकाºयांनी महापौरांना दिला आहे.विकासकामांची अपेक्षा दोन वर्षांत ठरली फोल-१९९५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत मी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलो. त्या काळी नगरसेवक निधी प्रारंभी दोन ते पाच लाखांपर्यंत वर्षाला मिळायचा. त्यातही महत्त्वाची नागरी हिताची कामे होत होती. परंतु, आजमितीला नगरसेवक निधीत वाढ होऊनही लोकप्रतिनिधींना प्रभागात कामे करण्यास निधी उपलब्ध होत नाही, ही शोकांतिका आहे, अशी खंत माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.१९९५ ते २००० कालावधीत निवासी भागातील रस्ते स्वत: महापालिकेकडे हस्तांतरित केले होते. तेव्हा त्याची डागडुजी व्हायची. परंतु, २००२ ते २०१५ या कालावधीत गावे वगळली गेल्याने पुन्हा कारभार ग्रामपंचायतीकडे आला. पण, पुन्हा गावे महापालिकेत आल्याने आतातरी विकासाची कामे होतील, अशी आशा होती. मात्र, दोन वर्षांत ती पुरती फोल ठरल्याचे म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे.निवासी भागातील अंतर्गत रस्त्यांची अतिशय धूळधाण झाली आहे. करदात्या नागरिकांना त्या रस्त्याचा त्रास सोसावा लागत आहे. एमआयडीसीने ते रस्ते ताब्यात घेण्याबाबत केडीएमसीला पत्र दिले आहे. परंतु, ठोस कृती आजवर झालेली नसल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका