भारनियमनाने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 03:55 AM2018-10-28T03:55:05+5:302018-10-28T03:56:35+5:30

दहा ते बारा तास काळोख; विद्यार्थ्यांना मेणबत्तीचा आधार, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

Weightlifting breaks down the professional curve | भारनियमनाने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले

भारनियमनाने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले

Next

पालघर : जिल्ह्यात १० ते १२ तासाचे भारनियमन लादण्यात आल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले असून एन परिक्षामध्ये विद्यार्थ्यांवर दिवा लावून अभ्यास करण्याची वेळ आली आहे. हे भारिनयमन रद्द करण्यासाठी सत्ताधारी आमदारानाच आपल्या सरकारविरोधात उपोषणाला बसण्याची वेळ आल्याची टीका शुक्रवारी विधानपरिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी केली आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.
जिल्ह्यातील वाढते भारनियमन आणि अन्य वीज समस्याचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार राजेंद्र गावित,जिप अध्यक्ष विजय खरपडे,आमदार अमति घोडा, जिल्हाधिकारीडॉ.प्रशांत नारनवरे, मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, विद्युत वितरण च्या अधीक्षक अभियंत्या किरण नगावकर, निलेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्ष १९७४ पासून वसई ते झाई-बोर्डी या किनारपटटीभागासह दगडधोंड आदी ग्रामीण भागात भागात बसविण्यात आलेले विद्युत खांब, तारा जीर्ण झाल्याने अनेक वेळा अपघात होत विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नवीन खांब, तारा बद्लण्याबाबत कार्यवाही व्हावी असे खासदार गावित यांनी सांगितले. त्यावर सदर भागाचे सर्वेक्षण करण्यात यावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना सांगितले.
सर्व तालुक्यात १० ते १२ तासांचे भारनियमन रद्द करण्या बरोबरच मीटर रिडींगसाठी नेमलेल्या एजन्सीकडून दोन दोन वर्षे रीडिंगच घेतली जात नसल्याचा आरोप जिप अध्यक्ष खरपडे यांनी केला.

महावितरणला प्रस्ताव सादर करण्याचे सवरांचे निर्देश
सागरी किनारा तसेच जुलै महिन्यात उद्भवलेली पूर परिस्थिती यामुळे विजेचे खांब, तारा यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी फिडर, सबस्टेशन यांची उंची वाढविणे आवश्यक आहे.
अर्नाळा भागात नवीन सबस्टेशन उभारणे, जव्हार-डहाणू या भागात नवीन लाईन उभारणे आदी मागण्या यावेळी महावितरणने केल्या. यावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Web Title: Weightlifting breaks down the professional curve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.