शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपरवानगीचा सावळागोंधळ

By admin | Updated: March 5, 2017 04:13 IST

उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत दौंड, भीमानगर, इंदापूर पाणी व्यवस्थापन विभागाच्या दोन्ही कार्यालयांतून समन्वय नसल्यामुळे उजनी धरण पाणी

देऊळगावराजे : उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत दौंड, भीमानगर, इंदापूर पाणी व्यवस्थापन विभागाच्या दोन्ही कार्यालयांतून समन्वय नसल्यामुळे उजनी धरण पाणी व्यवस्थापन विभागाच्या सावळा गोंधळासमोर आला आहे. मात्र याचा प्रत्यक्ष परिणाम दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेला शेतकऱ्यांना बसत आहे. वास्तविक पाहता उजनीच्या मुख्य शाखा असलेला भीमानगर इंदापूर येथून उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत स्पष्ट सांगण्यात येत आहे, की उजनी धरणातील शेतकऱ्यांना उजनीच्या पाण्याबाबत तात्पुरत्या स्वरूपात परवाने बंद करण्यात आले आहेत. दौंडच्या कार्यालयात पाणी परवानगीच्या स्थगितीबाबत इंदापूरचे भीमानगर उजनी पाणी व्यवस्थापन शाखेतून लेखी स्वरूपात काहीही आले नाही. परिणामी दौंडच्या शाखेतून पाणी परवानगीबाबत दौंडच्या शेतकऱ्यांचे रीतसर २७ पाणी परवानगीप्रकरणे भीमानगर येथील कार्यालयात पाठविण्यात आली आहेत. आता या शेतकऱ्यांपुढे या दोन्ही कार्यालयांतून मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. (वार्ताहर)शेतकरी चिंताक्रांतदौंडच्या पूर्व भागातील आलेगाव ते खानोटा भागातील शेतकरी पाणी परवानगी मिळविण्यासाठी शेतकऱ्याला होणारा खर्च भरण्यासाठी तयार आहेत. पाणी परवानगीबाबत तात्पुरती स्थगिती उठेल की कायम राहील याबाबत निर्णय होत नाही. आता जर शेतकऱ्यांनी पाणी परवानगीसाठी खर्च केला आणि तात्पुरती स्थगिती कायम राहिली तर शेतकऱ्यांनी केलेला खर्च वायाही जाईल आणि शेतातील पिके पाण्यावाचून जळून जातील या भीतीपोटी शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. बँकेतील कर्जप्रकरणे प्रलंबित...आलेगाव ते खानोटा या भागातील ज्या शेतकऱ्यांची उजनी धरणातील पाणी परवानगीची मुदत संपली आहे, त्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेतून दिली जाणारी कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. परिणामी आता शेतकऱ्यांना पिकांचे आर्थिक गणिते जुळविण्यासाठी लागणारी आर्थिक रसद बंद होण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत संबंधित खात्याने वेळीच निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.