शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

नोटांसोबत आता पाणीही बंद!

By admin | Updated: November 16, 2016 04:33 IST

एकीकडे पुरेशा नोटा मिळत नसल्याने आठवडाभर सुरू असलेली नोटा बंदी पुरेशी नव्हती काय, म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने

ठाणे/कल्याण : एकीकडे पुरेशा नोटा मिळत नसल्याने आठवडाभर सुरू असलेली नोटा बंदी पुरेशी नव्हती काय, म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने आठवडाभर आधीच पाणीकपात लागू करून नागरिकांच्या तोंडचे उरलेसुरले पाणीही पळवले. इतर पालिकांत अवघी सात टक्के कपात लागू असल्याने महिन्यातून अवघे दोन दिवस पाणी बंद राहणार असताना कल्याण-डोंबिवलीत मात्र चार दिवस पाणीकपात लागू राहणार आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरूही झाली.वस्तुत: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना इतक्या लवकर पाणीकपात लागू करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र अनेक महापालिका त्यांच्या मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याने पाटबंधारे विभागाने सात टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश दिले. ही कपात पालिकांनी आपल्या सोयीनुसार आठवड्याला सात टक्के या प्रमाणे चार दिवस किंवा महिन्यातूनव दोन दिवस लागू करायची होती. ठाणे पालिकेने पुढील आठवड्यापासून महिन्यातून दोन पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. उल्हासनगर पालिकेत अवैध जोडण्यांमुळे सध्या टंचाई लागू असल्याने तेथे कपातीचा निर्णय झालेला नाही. मीरा-भाईंदर, भिवंडी पालिकांनी अद्या निर्णय घेतलेला नाही, तर कल्याण-डोंबिवली पालिकेने महिन्ेयातून चार दिवस म्हणजे १५ टक्के कपात लागू करून आठवडाभर अगोदर त्याची अंमलबजावणीही सुरू केली. यंदा पाऊस चांगला झाल्याने फारशी कपात करावी लागणार नाही, असे पालिकेचेच अधिकारी सांगत असताना ही कपात लागू झाली आहे. मनपाला उपलब्ध कोट्यानुसारच पाणीकपातीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने लागू केला असून त्यानुसारच शहराचा पाणीपुरवठा दर मंगळवारी, तर ग्रामीण भागाचा दर शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. ठाणे जिल्ह्याातील महापालिकांना १५ नोव्हेंबरपासून पाणीकपातीची सक्ती लघुपाटबंधारे विभागाने केली आहे. मात्र कपातीचे वेळापत्रक अद्यापही तयार न झाल्यामुळे इतर महापालिकांत पुढील आठवड्यापासून पाणीकपातीची अंमलबजावणी होणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने दिलेल्या आदेशानुसार केडीएमसीने मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसीकडून २७ गावांना पाणीपुरवठा होत असल्याने त्यांचा पुरवठा शुक्रवारी बंद राहील, असे जाहीर केले आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरावा, यासाठी ही कपात लागू केल्याचे केडीएमसीचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)