शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
5
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
6
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
7
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
8
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
9
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
10
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
11
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
12
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
13
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
14
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
15
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
16
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
17
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
18
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
19
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
20
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव

निवडणुकीत आर्थिक व्यवहारांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 1:22 AM

उमेदवारांना बँक खाते उघडण्याची केली सक्ती : २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम काढणाऱ्याची चौकशी

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या काळात होणाºया आर्थिक उलाढालीवर निवडणूक आयोगाने कडक निर्बंध आणले आहेत. आचारसंहिता काळात मोठी आर्थिक उलाढाल होणाºया आणि संशयास्पद बँक खात्यांवर निवडणूक आयोगासह आयकर विभागानेही आपले लक्ष केंद्रित केले आहे. तर, आॅनलाइन बँकिंगच्या माध्यमातून होणाºया आर्थिक हेराफेरीवर पोलिसांच्या सायबर सेल विभागाने आपली करडी नजर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निवडणूक काळात राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून होणारी मोठ्या प्रमाणात उलाढाल यावर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे. एका उमेदवाराला प्रचार आणि इतर कारणांसाठी ७५ लाखांची मर्यादा दिलेली आहे. या मर्यादेचे पालन होते का? की वारेमाप खर्च होतोय? आणखीही कोणत्या ठिकाणी पैसे खर्च केले जात आहेत का? याचे निरीक्षण खर्च निरीक्षकांकडून केले जात आहे. निवडणूक खर्चाच्या व्यवहारासाठी उमेदवाराला बँकेमध्ये खाते उघडणे बंधनकारक केले आहे. याच खात्यामार्फत केलेल्या व्यवहाराचा तपशील खर्च नियंत्रण कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मोठी उलाढाल करणारे नेते, उमेदवारांच्या तसेच संशयास्पद बँक खात्यावर आयकर विभागासह पोलिसांनीही लक्ष केंद्रित केले आहे. आॅनलाइन आर्थिक हेराफेरीवरही पोलिसांच्या सायबर सेल विभागाची करडी नजर आहे.

लाखोंच्या उलाढालीवर विशेष नजरदोन महिन्यांत एखाद्या बँक खात्यावर कोणताही व्यवहार झालेला नसताना अचानकपणे त्या खात्यावर एखाद्यामार्फत पैसे जमा झाले किंवा एका खात्यातून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले. तसेच २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम काढण्यात आली किंवा जमा करणाºया संशयास्पद खात्यांवरही पोलिसांसह निवडणूक आयोगाचीही नजर राहणार आहे. एखादी एजन्सी बँकेसाठी आउटसोर्सिंग करत असेल, तर त्या एजन्सीकडे ओळखपत्र तसेच संबंधित बँकेचे ओळखपत्र आहे की नाही, याबाबतदेखील पोलीस पडताळणी मोहीम राबवणार आहेत. तर, संशयास्पद व्यवहार, बनावट नोटा आदी घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आपल्या विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.

याठिकाणी पकडली रोकडजिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांपैकी भिवंडीमधून पहिल्या दिवशी साडेचार लाख रुपये आणि दुसºया दिवशी दोन लाख १४ हजार आणि १० लाखांची रक्कम वाहनातून पकडण्यात आली. या रोकडजप्तीच्या तीन घटना भिवंडीमध्ये घडल्या आहेत. तर, ठाणे मतदारसंघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघामधील उरणफाटा ब्रिज येथे वाहनातून नेण्यात येणारी १० लाखांची रक्कम पकडण्यात आली आहे. खर्च निरीक्षकाच्या पथकांकडून या रकमा पकडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग